व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

बजाज फिनसर्व्ह EMI कार्ड | Bajaj Finserv EMI Card

नमस्कार मित्रांनो, आज आपण बजाज फिनसर्व्ह ईएमआय कार्ड (Bajaj Finserv EMI card ) साठी अप्लाय कसे करायचे, त्यासाठी कोण कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते, या अश्या सर्व गोष्टीं बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, शॉपिंग करायला कोणाला आवडत नाही, प्रत्येकालाच शॉपिंग करायला आवडत. पण पैसे कमी असल्याने तुम्ही वस्तू खरेदी करणे टाळता का? जर तुमचे उत्तर हो असेल, तर मित्रांनो, असे करू नका. कारण आता तुम्ही अँड्रॉइड मोबाईल, स्मार्ट एलईडी टीव्ही, लॅपटॉप, एसी, कॉम्प्युटर इत्यादी सर्व वस्तू बजाज ईएमआय कार्ड द्वारे हप्त्यांवर खरेदी करू शकता. मित्रांनो, पूर्वीच्या काळी आपण वस्तू खरेदी करताना रोख पैसे द्यायचो. पण आता परिस्थिती बदलली आहे. अनेक जण पैश्यांची अडचण आहे म्हणून किंवा इतर काही कारणांमुळे हप्त्याने एखादी वस्तू खरेदी करतात. आणि नंतर ईएमआई च्या रुपात हळूहळू पैसे भरतात. जेणेकरून स्वतः वर आर्थिक अडचण येऊ नये. मित्रांनो, यासाठी तुम्ही बजाज ईएमआई कार्ड चा वापर करू शकता.

हो मित्रांनो, बजाज ईएमआय कार्ड हे एक क्रेडिट कार्ड सारखेच आहे. जे तुम्हाला तुमच्या क्रेडिट स्कोर नुसार व्यवहाराची मर्यादा देते. म्हणजे तुम्ही ईएमआई वर 50 ते 60 हजार रुपये पर्यंत ऑनलाईन शॉपिंग करू शकता आणि दर महिन्याला हप्त्यांमध्ये ईएमआई भरू शकता. मुख्य म्हणजे यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचे व्याज द्यावे लागत नाही. याच बजाज ईएमआय कार्ड बद्दल अजून काही माहिती आपण पुढे बघणारच आहोत. त्यामुळे आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

सर्वात पहिले बजाज फिनसर्व्ह ईएमआय कार्ड म्हणजे काय आहे ते जाणून घेऊ या.

बजाज कार्ड मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.👇

बजाज फिनसर्व्ह EMI कार्ड म्हणजे काय ?

मित्रांनो, बजाज फिनसर्व्ह ईएमआय कार्ड हे खरेदी करण्यासाठी वापरले जाणारे एक डिजिटल कार्ड आहे. जे तुम्हाला सर्वात मोठी खरेदी करण्यास मदत करते. अगदी कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, टेलिव्हिजनपासून ते फर्निचरपर्यंत, तसेच जीवनावश्यक उत्पादने आणि तुमच्या आवडीच्या सर्व मोठ्या वस्तू खरेदीसाठी, बजाज फिनसर्व्ह ईएमआय कार्ड तुम्हाला उपयोगी पडणारे कार्ड आहे. या कार्ड द्वारे तुम्ही बजाज च्या पार्टनर स्टोअर मधून तुमच्या गरजेनुसार तुम्ही खरेदी करू शकता. आणि यात 3 ते 24 महिन्यांच्या कालावधीत ईएमआई भरू शकता.

How-to-apply-Bajaj-Finserv-EMI-Card-Information-in-Marathi

बजाज फिनसर्व्ह ईएमआय कार्डसाठी किती चार्जेस द्यावे लागतात?

मित्रांनो, बजाज फिनसर्व्ह ईएमआय कार्ड साठी तुम्हाला एकूण 599 रुपये GST सह द्यावे लागतात. आधी याची फी 530 रुपये इतकी होती. पण आता ती वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता तुम्हाला जीएसटी सह एकूण 599 रुपये द्यावे लागणार आहेत. यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची अन्युअल फी म्हणजे वार्षिक फी सुद्धा असते. जर तुम्ही हे कार्ड एका वर्षात एकदा पण युझ केले नाही तर तुम्हाला 190 रुपये भरावे लागतात. आणि जर तुम्ही हे कार्ड एका वर्षात वापरले तर तुम्हाला वार्षिक फी द्यावी लागणार नाही.

बजाज कार्डला अप्लाय करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇

बजाज फिनसर्व्ह ईएमआई कार्ड पात्रता काय आहे व कोण कोणते कागदपत्रे लागतात?

मित्रांनो, बजाज फिनसर्व्ह ईएमआय कार्डसाठी तुमचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त आणि 65 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच या कार्डसाठी तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड, आणि तुमचे बँक अकाउंट डिटेल्स जे मोबाईल नंबर शी लिंक केलेले असेल.

बजाज फिनसर्व्ह EMI कार्ड कसे आणि कुठे वापरायचे

समजा तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायची आहे, अशा वेळी तुम्ही तुमचे प्रॉडक्ट तुमच्या आवडत्या शॉपिंग वेबसाइट (ऍमेझॉन, फ्लिपकार्ट…) मधून निवडायचे आहे आणि चेकऊट EMI ऑपशन निवडून या कार्ड चे डिटेल्स टाकायचे आणि अशा तर्हेने तुम्ही महागाची वस्तू ऑनलाईन EMI वर घेऊ शकता. आणि जर तुम्हाला ऑफलाईन शॉपिंग करायची असेल तर दुकानदाराला सांगा कि माझ्याकडे बजाज फिनसर्व्ह ईमआय कार्ड आहे, दुकानदार त्याला नेमून दिलेल्या बजाज एजन्ट ला बोलावून तुमच्या वस्तू ला EMI मध्ये करून देईल.

बजाज कार्ड मिळवण्यासाठी अर्ज करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा. 👇

FAQ

बजाज फायनान्स इएमआई कार्ड ची मर्यादा किती आहे?

मित्रांनो, बजाज फायनान्स इएमआई कार्ड वर तुमच्या सिबील (CIBIL) स्कोर नुसार मर्यादा दिली जाते.

बजाज फायनान्स कार्ड काढण्यासाठी किती शुल्क आकारले जाते?

मित्रांनो, बजाज फायनान्स कार्ड साठी रू 530 भरावे लागतात. नंतरच कार्ड ऍक्टिव्हेट केले जाते.

शॉपिंग साठी बजाज कार्ड वापरता येते का?

मित्रांनो, तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोणत्याही नेटवर्क स्टोअर मध्ये बजाज फायनान्स ईएमआई कार्ड वापरू शकता. तसेच अनेक पार्टनर स्टोअर्स मध्ये मुख्य ब्रँड वेबसाइट्स व ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म समाविष्ट आहेत. मित्रांनो, एवढेच नाही तर तुम्हाला अनेक प्रॉडक्ट्स वर नो कॉस्ट EMI चा लाभ देखील मिळतो.

बजाज फायनान्स ईएमआई कार्ड मधून पैसे काढता येऊ शकते का?

नाही मित्रांनो, तुम्ही तुमचे बजाज फायनान्स ईएमआई कार्ड वापरून एटीएम मधून पैसे काढू शकणार नाही.

विद्यार्थी बजाज फायनान्स ईएमआई कार्डसाठी अर्ज करू शकता का?

मित्रांनो, जर तुमचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही तुमची बजाज EMI कार्ड साठी पात्रता तपासून बजाज कार्डसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

एकदा बजाज फिनसर्व्ह कार्ड ऍक्टिव्हेट केल्यावर लगेच फ्लिपकार्ट किंवा ऍमेझॉन वरून ऑनलाईन शॉपिंग करू शकतो का?

नाही मित्रांनो, कार्ड ऍक्टिव्हेट झाल्यावर तुम्हाला सर्वात आधी एखाद्या ऑफलाईन स्टोअर मध्ये जाऊन ट्रांझेक्शन करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला काही डॉक्युमेंट्स द्यावे लागतील. जसे की तुमचे बँक डिटेल्स, पासबुक चे फोटो कॉपी, आधार कार्ड, वगैरे. डॉक्युमेंट देऊन मग तुमचे कार्ड पूर्णपणे ऍक्टिव्हेट होऊन जाईल

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण बजाज फायनान्स इएमआई कार्ड साठी अप्लाय कसे करायचे या बद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद।

Leave a Comment

error: Content is protected !!