व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

शेतकऱ्यांना कडबा कुट्टी मशीन खरेदीसाठी मिळणार 50 टक्के अनुदान|कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना 2023 महाराष्ट्र | kadba kutti machine yojana 2023.

कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना 2023 Kadba Kutti Machine Scheme 2023 Mahadbt Farmer Scheme 2023

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

             ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेतीला पूरक जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय केला जातो. अधिक आर्थिक उत्पन्न मिळण्याकरिता शेतकरी शेती व्यवसायाबरोबर गाई, म्हशी, शेळी, मेंढी, गुरे-ढोरे पालन करत असतो.  आजही मोठ्या प्रमाणात पशु पालन व्यवसाय ग्रामीण भागात केला जातो. ज्या शेतकऱ्यांकडे गायी, म्हशी व इतर जनावरे आहेत अशा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात चाऱ्याची व पाण्याची व्यवस्था करावी लागते.            

kadba kutti machine yojana 2023 

        पशुपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कडबा कुट्टी यंत्र असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण जास्त जनावरे असतील तर त्यांना जास्त चारा द्यावा लागतो, त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात जनावरांचा चारा आपण कापून देऊ शकत नाही. त्यामुळे जर आपल्याकडे कडबा कुट्टी मशीन असेल तर आपण कडब्याचे कमी वेळेत बारीक-बारीक तुकडे करून घेऊ शकतो. कडबा कुट्टी मशिनमुळे शेतकऱ्यांचे शारीरिक कष्ट कमी होऊन जास्तीत जास्त प्रमाणात जनावरांना पशु खाद्य मिळू शकते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायात अधिक आर्थिक उत्पन्न मिळू शकते.   हे पण नक्की पहा.

कडबा कुट्टी मशीन साठी अर्ज करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा 👇👇

  कडबा कुट्टी अनुदान योजना

राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती पाहता त्यांना कडबा कुट्टी मशीन खरेदी करणे शक्य नसते. म्हणून याचा विचार करता महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी कडबा कुट्टी यंत्र (चाफ कटर मशीन) अनुदान योजना राज्यात  राबविली जात आहे. शेतकऱ्यांना शासनामार्फत कडबा कुट्टी यंत्र खरेदी करण्यासाठी यंत्र किंमतीच्या 50 टक्के अनुदान किंवा 20 हजार अनुदान देण्यात येते. ही योजना शेतकऱ्यांना अतिशय फायद्याची ठरत आहे अनेक शेतकरी या योजनेचा लाभ देखील घेत आहे. कडबा कुट्टी मशीन योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत आहे. या लेखात आपण योजनेसाठी असणारी पात्रता, आवश्यक असलेली कागदपत्रे, योजनेच्या अटी व शर्ती याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.  

कडबा कुट्टी मशिन वापराचे फायदे (Kadba Kutti Machine Benefit):

कडबा बारीक केल्यामुळे जनावरांना खाण्यासाठी सोयीस्कर होतो. मोठा कडबा अगदी कमी वेळेत बारीक कापला जातो. कडबा बारीक केल्यामुळे कमी जागेत साठवणूक करता येते. शेतकऱ्यांचे शारीरिक कष्ट कमी होते व जास्तीत जास्त आर्थिक उत्पन्न मिळण्यास मदत होते. चाऱ्याची नासाडी कमी होऊन शेतकऱ्यांना चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन करता येते.

  हे पण नक्की पहा👉🏼: केवळ एक रुपयात पिक विमा योजना 2023

Kadaba Kutti Machine Subsidy (कडबा कुट्टी यंत्र अनुदान) योजनेसाठी आवश्यक पात्रता:

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

  • अर्जदार शेतकऱ्यांच्या नावावर दहा एकर पेक्षा कमी शेतजमीन असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराकडे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • बँक खाते आधारकार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
  • जर तुम्ही वरील सर्व गोष्टीकरता पात्र असाल तर तुम्ही कडबा कुट्टी मशीन अनुदानासाठी अर्ज करू शकता.  

कडबा कुट्टी मशीन साठी अर्ज करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा 👇👇

  कडबा कुट्टी मशीन अनुदान साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:

  • आधारकार्ड  
  • जमिनीचा 7/12 व 8 अ उतारा
  • तुमच्या घराचे वीज बिल
  • जातीचा दाखला (आरक्षण असल्यास)
  • बँक पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत (आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक)
  • GST बिल, कोटेशन, हमीपत्र, करारनामा (लॉटरी लागल्यानंतर)

  हे पण नक्की पहा👉🏼: पी एम किसान योजनेत पैसे येत नसतील तर हे करा.

Leave a Comment

error: Content is protected !!