व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

किसान क्रेडिट कार्ड |kisan credit card|किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय व त्याचे फायदे.

शेतकऱ्यांसाठी खास किसान क्रेडिट कार्ड; जाणून घ्या या कार्डचे नेमके फायदे, अर्ज कसा करायचा?

किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच केसीसी ही एक योजना आहे, जिचा उद्देश शेतकऱ्यांना शेतीसंबंधीच्या कामासाठी आर्थिक मदत करणं हा आहे. केसीसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बी-बियाणे, खतं, कीटकनाशकं इ. शेतीच्या कामांसाठी कर्ज दिलं जातं.

केसीसीसाठी सगळेच शेतकरी अर्ज करू शकतात. यामध्ये स्वत:च्या मालकीची जमीन असणारे, इतरांची जमीन भाडेतत्वावर करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश होतो.

याशिवाय 2018-19च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान पशुपालन (शेळीपालन, मेंढीपालन कुक्कुटपालन इ.) आणि मत्स्यपालन (animal husbandry and fisheries) करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्याचं निश्चित करण्यात आलं.

किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत पात्र बँकांची यादी पहा. 👇👇👇

Kisan Credit Card Benefits: किसान क्रेडिट कार्डवर बँक फक्त ४ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध जर शेतकऱ्याने पहिल्या कर्जाची ५ वर्षांच्या कालावधीत वेळेवर परतफेड केली तर त्याला २ टक्के सवलत मिळते.  

भारत हा प्रामुख्याने कृषीप्रधान देश मानला जातो. देशातील मोठी लोकसंख्या आजही शेतीतून उदरनिर्वाह करत आहे. देशाच्या जीडीपीमध्ये शेतीचा वाटा १७ ते १८ टक्क्यांपर्यंत आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध योजना आणत असते. यापैकी एक योजना ‘किसान क्रेडिट कार्ड’ आहे.

कृषी उत्पादन अनेक गोष्टींवर अवलंबून असते, ज्यामध्ये हवामान हा प्रमुख घटक आहे. अनेक वेळा वादळ, पूर, अतिवृष्टी आदींमुळे पिकांचे नुकसान होते, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागते. खाजगी संस्थेकडून उच्च व्याजदराने कर्ज घेऊ शकतात, मात्र नंतर त्यांच्यावर ईएमआयचे ओझं वाढू शकतं. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्ड सुरू केले.

ही योजना मुळात १९९८ मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदराने कर्ज मिळण्याची तरतूद आहे. या योजनेबद्दल अधिक जाणून घेऊया.

किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना कमी व्याजदरात ३ लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. हे कर्ज केवळ ४ टक्के व्याजदराने दिले जाते. किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी तुमचे वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वय वर्ष ७५ पर्यंतचे शेतकरी या क्रेडिट कार्डचा लाभ घेऊ शकतात.

किसान क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मतदार ओळखपत्र आधार कार्ड चालक परवाना पासपोर्ट शेतकऱ्याच्या जमिनीची कागदपत्रे

किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज करण्याची पद्धत👇👇👇

किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करावा.

किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत अर्ज करू शकता. तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जा आणि किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज भरा. यानंतर तुम्हाला वर नमूद केलेली सर्व कागदपत्रे जमा करावी लागतील. यानंतर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड मिळेल. याशिवाय तुम्ही बँकांच्या अधिकृत वेबसाइटद्वारे केसीसीसाठी अर्ज करू शकता. मात्र लक्षात ठेवा की हे कार्ड मिळवण्यासाठी तुमचं पीएम किसान योजनेअंतर्गत बँक खातं असणं आवश्यक आहे.

किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज करा.

Leave a Comment

error: Content is protected !!