व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

द्राक्षा मधील मिलीबग चे नियंत्रण आणि उपाययोजना

द्राक्षा मधील काही प्रमुख किडींपैकी मिलीबग ही एक मुख्य कीड आहे. ही कीड द्राक्षामध्ये खूपच त्रासदायक ठरते. शेतकरी मित्रांनो आज आपण मिलीबग नियंत्रणासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील यासंदर्भात माहिती घेऊया.

मिलीबग ची ओळख व जीवनचक्र :

मिली बघ चे शरीर लांबट आकाराचे असून मुगाच्या डाळी इतके असते त्यावर पांढरे कापसासारखा कवच असतो. मिलीबगचे शरीर हे मऊ आकाराचे असते. तिला सहा पाय असतात. मिली बघ हे पानांच्या देठाजवळ तसेच खोडांवर व सालींच्या आत मध्ये अंडी घालते तसेच ते पांढरट आकाराच्या व कापसासारख्या पुणक्यामध्ये एकत्र अंडी देते. मिली बघ चे जीवन चक्र हे 30 ते 35 दिवसांचे असते मिलीबग हे पानांवर कोवळ्या फांद्यांवर तसेच द्राक्षाच्या घडांवरती रस शोषण करून आपले जीवन चक्र पुढे ढकलत असते.

मिलीबगच्या प्रादुर्भावामुळे कोवळ्या फुटींवर एक वाढ खुंटते व तेथे गुच्छ तयार होतो तसेच पानांचा आकार बिघडतो मिली बघ गडामध्ये गेल्यास गडांमधील रसोसिएशन करून शेवटच्या टप्प्यात मिलीबग द्राक्षांवर आढळल्यास व्यापाऱ्यांकडून माल घेतला जात नाही. मिलीबघ च्या शरीरामधून चिकट द्रव बाहेर पडतो तो चिकट द्रव पाणे व घडांवर पडल्यावर त्यावरती काळ्या रंगाची बुरशी तयार होते. तसेच त्या चिकट द्रवाला आकर्षण होऊन मुंग्या येतात व मुंग्याद्वारे मिलीबग चे प्रसारण होते.

मिलीबग चे नियंत्रण

मिलीबग चे नियंत्रण हे टप्प्याटप्प्याने वर्षभर करावे लागते.

खरड छाटणीनंतर खोडे व ओलांडी धुऊन घ्यावे लागतात. त्यामध्ये क्लोरोपायरीफॉस 50 टक्के १ मिली व ॲपलॉड १.५ मिली प्रति लिटरने घेऊन दाट फवारणी करावी. खोड व ओलांडे व्यवस्थितपणे धुवून घ्यावेत.

पावसाळ्याच्या काळामध्ये म्हणजेच सरासरी जून व जुलैमध्ये खोडांची साल झाल्यानंतर हाताने चोळून काढून टाकावी. त्यानंतर संपूर्ण झाडावर व्हर्टीसिलीयम लॅकेनी व मेटायराईझम ची फवारणी करावी. दोन्हींचे प्रमाण ५ मिली प्रति लिटरने घ्यावे.

छाटणीनंतर चाळीस दिवसांच्या पुढे मिलीबगचा प्रादुर्भाव आढळल्यास केमिकल च्या फवारणीचा आधार घेऊन नियंत्रण करावे. यासाठी इमिडाक्लोप्रिड किंवा डेनटोटसू चा वापर करावा. किंवा मोव्हेंटो एनर्जी १.५ मिली किंवा अपलोड १.५मिली चा वापर करू शकता. पावसाळ्यामध्ये मिलीबग नियंत्रित करण्यासाठी शक्यतो जैविक कीटकनाशकांचा वापर करावा.

फळ छाटणी नंतरचे मिलीबग नियोजन :

छाटणी आधी आठ दिवस झाडांची साल ही मोकळी झालेली असते ती काढून घ्यावी. प्लॉटमधील पूर्णपणे तन नियंत्रण करावे. मिली बघ हे जमिनीवर देखील आढळते त्यामुळे जमीन मशागत करून घ्यावी. छाटणी झाल्यानंतर दोन दिवसांनी खोड व ओलांडी धुऊन घ्यावेत. यासाठी एक दिवस सोडून दोन फवारण्या घ्याव्यात. या फवारण्यांमध्ये लिफान औषध व अपलोड औषधाचा वापर करावा. दोन्ही औषधांचा वापर १.५ मिली प्रति लिटरने करावा. फवारणी कच्च घ्यावी.

फळ छाटणी नंतर मिलीबघ नियंत्रित राहण्यासाठी द्राक्ष बाग फ्लॉवरिंग मध्ये असताना मिलीबघ वर फवारणी करणे गरजेचे असते. या काळामध्ये मोव्हेंटो एनर्जी १.५ मिली किंवा अपलोड १.५ मिली प्रति लिटरने या कीटकनाशकांचा वापर करावा. त्यानंतर दहा दिवसांनी मोव्हेंटो od चा ४०० मिली प्रति एकर वापर करावा.

या काळामध्ये एखाद्या झाडाला जास्त मिलीबग दिसत असेल तर त्या झाडाचे खोड व ओलांडी धुऊन घ्यावेत. मिलीबग दिसत असणाऱ्या झाडांना रिबन बांधून ठेवावे. ज्या शेतकऱ्यांनी मिलीबग नियंत्रणासाठी फ्लोरिंग मध्ये फवारणी घेतली नाही त्यांनी मिलीबग नियंत्रणासाठी ड्रिंचिंग म्हणजेच सॉईल अप्लिकेशन द्यावे. यासाठी स्लेयर प्रो १ लीटर प्रति एकर किंवा ॲडमायर ३०० ग्रँम प्रति एकर चा वापर करावा. फुलोरा अवस्थेनंतर थीनिंग करत असताना जे घड ओलांडण्याला स्पर्श करत आहेत ते घड काढून टाकावेत कारण त्यांना सर्वात पहिला मिलीबग चा अटॅक होतो.

द्राक्ष मण्यांमध्ये पाणी फिरण्याच्या अवस्थेमध्ये मिलीबग हा वाढत असतो. कारण या काळामध्ये तापमान वाढलेले असते, जास्त तापमानामध्ये मिलीबघ जास्त अटॅक करतो. म्हणण्यांमध्ये पाणी उतरलेल्या अवस्थेमध्ये आपण दोन फवारण्या घ्यायला हव्यात. व दोन जैविक फवारणी घ्यायला हव्यात. यासाठी व्हर्टीसिलीयम लॅकेनी व मेटायराईझम या जिवाणूंचा वापर करावा. व केमिकल नियंत्रणासाठी ॲपलोड १.५ मिली सोबत कॉन्फिडॉर ०.७ मिली चा वापर करावा.

मिलीबग नियंत्रणासाठी महत्त्वाच्या गोष्टी :

खरड छाटणी व फळ छाटणी या दोन्ही वेळी द्राक्ष बागेचे खोड व ओलांडी धुऊन घेणे खूपच गरजेचे आहे. मिली बॉक्सिंग नियंत्रण करण्यासाठी जैविक बुरशीनाशक व कीटकनाशक यांचा जास्तीत जास्त वापर करावा. यामुळे रेसिड्यू चा प्रॉब्लेम येणार नाही. फुल छाटणी मध्ये पहिल्या साठ दिवसांच्या आधी दोन फवारण्या मिलीबग साठी घ्याव्या लागतात. या चुकूवू नयेत. मिली बघ येत आहे का हे पाहण्यासाठी झाडांवर व खोडांवर साल काढून पाहणे गरजेचे आहे. जर झाडांवर कुठेतरी चिकट द्रव आढळल्यास व्यवस्थितपणे निरीक्षण करून फवारणी घ्यावी. मिलीबघ नियंत्रणासाठी दर आठवड्याला फवारणी घेतल्यास चांगला रिझल्ट आपल्याला दिसू शकतो. आपल्या द्राक्ष बागेमध्ये जर मिली बघ आलेला असेल तर त्याला घालवण्यासाठी औषधाचे चांगल्या प्रकारचे कव्हरेज येणे गरजेचे आहे. एकही एक हजार लिटर पर्यंत पाणी फवारून झाडे व ओलांडे, खोडे धुवून घ्यावेत. मिली बघ नियंत्रणासाठी द्राक्ष बागेची मुळी चालू असणे गरजेचे आहे. द्राक्ष बागेची मुळी जर बंद असेल तर त्यावेळी झाड केलेली ड्रिंकिंग उचलणार नाही व त्यामुळे प्रभावी नियंत्रण मिळणार नाही. द्राक्ष पिकलेली असताना शेवटच्या टप्प्यात जास्त विषारी औषधे फवारू नयेत. जेणेकरून ती द्राक्ष खायला यावीत.

वेळच्यावेळी नियोजन केल्यास मिलीबग नियंत्रित करणे खूपच सोपे जाते. व मिलीबग चा प्रादुर्भाव देखील वाढत नाही.

धन्यवाद. By सचिन पाटील . Mo . 9710091400.

Leave a Comment