व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

मातोश्री शेत पाणंद रस्ता योजना |शेत रस्ता योजना संपूर्ण माहिती


मातोश्री पाणंद रस्ता शासन निर्णय pdf: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद/रस्ता योजना बद्दल माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्ही शेताच्या वाटेमुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्यांना आणि भांडणांना तोंड देत असाल, तर ही योजना तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. कारण या योजनेच्या अंमलबजावणीचा शासन निर्णय  दिल आहे. शेत रस्त्यासंबंधित तुमचे जे प्रश्न असतील ते या लेखातुन आणि शासन निर्णय pdf मध्ये दिलेल्या माहितीच्या मदतीने सुटणार आहेत.

मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद/रस्ते योजना महाराष्ट्र –

शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे आणि यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी व इतर सर्व कामे यंत्रांमार्फत करण्यात येत असल्यामुळे, तसेच शेतीमाल बाजारात पोहोचण्याकरता व यंत्रसामुग्री शेती पर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही चांगल्या वाटेची आवश्यकता असते. तसेच शेत रस्ते हे रस्ते योजनेमध्ये येत नसल्याने शासनाच्या दिनांक २७ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णय नुसार विविध योजनांच्या अभिसरणामधून ‘पालक मंत्री शेत/पाणंद रस्ते योजना’ महाराष्ट्र राज्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता.

शेत जमिनीला रस्ता नसेल तर तो रस्ता मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा. 👇👇

इतर काही योजना: 👇👇

इलेक्ट्रिक मोटर पंप योजना

रूफटॉप सोलार योजना

शेळीपालन अनुदान योजना

शेतमाल पॅकिंग साठी शेड योजना

सदर योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत असताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी विचारात घेऊन, तसेच या योजनेत तयार होणाऱ्या रस्त्यांची गुणवत्ता परिभाषित केलेली नसल्यामुळे बर्‍याच ठिकाणी शेत रस्त्यांची कामे होऊनही रस्त्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला जात नाही. रस्त्यांची गुणवत्ता परिभाषित नसल्यामुळे काही ठिकाणी अतिक्रमण काढून रस्त्यावर फक्त माती टाकली जाते. याने रस्ता रुंद झालेला दिसून येतो पण पाऊस पडल्यावर तेथे चिखल होऊन परत तो रस्ता वापरण्यास योजल्या राहत नाही. त्याचप्रमाणे अधिक पाऊस पडल्यास असे मातीचे रस्ते वाहून जातात व रस्ते बनवण्यासाठी केलेले काम शून्य होते. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकरी आणि गावकरी समृद्ध होतील या स्वप्ना करिता आपल्या राज्यात ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ आणि ‘गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध’ ही संकल्पना राबवण्यात येत आहे.

शेत रस्ते योजना माहिती –

राज्यातील शेत रस्ते हे देखील अन्य महामार्गा एवढेच महत्त्वाचे आहेत. शेतात पीक तयार होताच ते काढून योग्य ठिकाणी साठवले गेले पाहिजे किंवा बाजारात विकले गेले पाहिजे. परंतु रस्ता नीट नसल्यामुळे शेतकऱ्यांना ते करणे शक्य होत नाही. पावसाळ्यात निघणारी पिके आर्थिक दृष्ट्या कितीही फायदेशीर असली तरी रस्त्या अभावी ती विकण्याचा विचार शेतकऱ्यांना करता येत नाही. पाणंद रस्त्याची अनुपलब्धता crop diversification मोठा अडथळा आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या श्रीमंतीचा मार्ग अवरुद्ध करणारा हा एक मोठा घटक धरला जात आहे. त्यामुळेच राज्यातील सर्वदूर शेतकरी लोकप्रतिनिधींकडे शेत रस्त्याची मागणी करत असताना दिसून आलेली आहेत.

राज्यातील काही जिल्ह्यात या कामाकडे अधिक लक्ष दिले गेलेले आहे. त्यामुळे हळूहळू या रस्त्याच्या कामास चळवळीचे स्वरूप येताना दिसून येत आहे. त्यातच आता प्रत्येक ग्रामीण कुटुंबास लखपती करण्याचे उद्दिष्ट सुद्धा रुजत चालले आहे. अशा परिस्थितीत शेत/ पाणंद रस्ते उच्च गुणवत्ता पूर्ण आणि बारमाही वापरण्यायोग्य असणे आवश्यक आहे. त्यामुळे पालक मंत्री शेत/पाणंद रस्ते योजना राबवण्याबाबत दिनांक २७ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णयामध्ये रस्ते गुणवत्तापूर्वक तयार करण्यासाठी या बाबी विचारात घेऊन सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये खालील शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.

पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजना शासन निर्णय दिनांक ११ नोव्हेंबर २०२१

महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकरी आणि प्रत्येक गावकरी समृद्ध व्हावेत या दृष्टिकोनात मधून ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ आणि ‘गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध’ ही संकल्पना मनरेगा व राज्य रोहयोच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. शेत/पाणंद रस्ते हे प्रामुख्याने शेतीमध्ये कामाकरिता आवश्यक असणाऱ्या साधनांची ने आण करण्याकरिता उपयोगात येतात. आधुनिक यांत्रिकीकारणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर सर्व कामे यंत्रामार्फत करण्यात येतात. या यंत्रसामुग्रीची वाहतूक करण्याकरिता बारमाही वापराकरिता शेत रस्ते चांगले असणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रमाणित दर्जाचे शेतरस्ते तयार करण्याकरिता ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’ राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना मार्गदर्शक सूचना कोणत्या?

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना कार्यक्षमतेने राबवण्यासाठी खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत.

अ. एका गावाहून दुसऱ्या गावात जाणारे रस्ते –
i. ग्रामीण रस्ते व हद्दीचे ग्रामीण रस्ते (गाव नकाशा मध्ये दोन भरीव रेषांनी दाखवलेले असून या रस्त्याची जमीन कोणत्याही भूमापन क्रमांकामध्ये समाविष्ट केलेली नाही)

ii. ग्रामीण गाडीमार्ग (गाव नकाशा मध्ये दुबार रेशमी दाखवलेले असून ज्या भूमापन क्षेत्रामधून जाते त्यामध्ये पोट खराब म्हणून दर्शवलेले आहे अशा रस्त्यांची नोंदणी साडेसोळा ते २१ फूट आहे.)

iii. पाय मार्ग (गाव नकाशा मध्ये तुटक रेषेने दर्शविले असून ज्या भूमापन क्षेत्रामधून जातो त्यामध्ये पोट खराब म्हणून दर्शवलेले आहे अशा रस्त्यांची रुंदी सव्वा आठ फूट आहे.)

ब. शेतावर जाण्याची पाय मार्ग व गाडी मार्ग
हे रस्ते नकाशावर दर्शवलेले नाहीत परंतु वाद निर्माण झाल्यास अशा रस्त्यांबाबत निर्णय देण्याचे अधिकार कलम १४३ नुसार तहसीलदारांना दिलेले आहेत. त्यानुसार वहिवाटीचे असलेले रस्ते.

क. इतर ग्रामीण रस्ते

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत कोणत्या क्षेत्र रस्त्यांची कामे केली जातील?

i. अस्तित्वातील शेत/पाणंद कच्चा रस्त्याचे मजबुतीकरण करणे.
ii. शेत पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्त करून कच्चा व पक्का रस्ता एकत्रितपणे करणे.

मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना कोणत्या यंत्रणेमार्फत कार्य करतील?

i. ग्रामपंचायत
ii. जिल्हा परिषद बांधकाम विभाग/ उपविभाग
iii. सार्वजनिक बांधकाम विभाग/उपविभाग
iv. वनविभाग (वनजमीन असेल तेथे)

इतर काही योजना:👇👇

ट्रॅक्टर अनुदान योजना

कडबा कुट्टी अनुदान योजना

कुसुम सोलर योजना

नमो शेतकरी महा सन्मान योजना

शेत जमिनीला रस्ता नसेल तर तो रस्ता मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा. 👇👇

Leave a Comment

error: Content is protected !!